Select Page

मा.श्री.आनंदराव माईंगडे

संस्थापक / संचालक

सन १९८७ साली दत्तसेवा सहकारी पतपेढीची स्थापना करण्यात आली. प्रथम दोन वर्षे श्री. आनंद माईंगडे (दादा) यांच्या राहत्या घरात संस्थेचे काम चालु ठेवले. त्यानंतर मालवणी येथे जागा घेऊन कार्यालय सुरु केले. आज संस्थेच्या मालवणी, गोरेगाव, गोराई, जोगेश्र्वरी (प), कांदिवली, जोगेश्र्वरी (पू), मालाड (पू), बांबवडे, नायगाव ,शेडगेवाडी, म्हाडा मालवणी, दहिसर, भांडूप, नालासोपारा,तुरुकवाडी,घाटकोपर,अंधेरी व विरार मलकापुर अशा एकुण 19 शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा संगणीकृत असून सर्व शाखा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत. संस्थेचा संमिश्र व्यवसाय 475 कोटी व सभासद संख्या 78695 आहे. दत्तसेवा सहकारी पतपेढीचे 118 कर्मचारी व 116 दैनंदिन प्रतिनिधी आहेत.

आपल्या कर्तृत्वाने राज्य, देश पातळीवर चमकणारे, नावलौलिक मिळवणारे भरपुर आहेत. परंतु ते देखील आपल्या गावाकडील व्यक्ती, आपल्या बालपणाचा काळ, त्यावेळची परिस्थिती याचा विचार करित नाहीत. काही वेळा स्वार्थ बाजुला ठेवुन परमार्थ, समाजसेवा देखील करावी लागते वरील सर्व बाबीचा विचार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवाने आपल्या काही गुणात्मक कलेने आपले जीवन परिपुर्ण केलेले असते. परंतु त्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, चिकाटी व श्रम करण्याची कुवत.आपला गाव, आपल्या गावातील विकास सोडुन काही तज्ञ शिक्षित लोक हे शहरामध्ये स्थायिक होतात. ग्रामीणतेचा विचार करत नाहीत. परंतु माझ्या मते एक व्यक्ती यास अपवाद आहे ती म्हणजे मा. श्री. आंनद ईश्वर माईगडे (दादा) जन्म दि. ०१/०६/१९५८ एका छोटया कुंटुंबात जन्माला येऊन विशाल असे कार्य आज यांनी साकाराले आहे ते केवळ ग्रामीण भागाची जाण असल्यामुळे व गावच्या विकासाच्या तळमळीनेच.आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण झाले नंतर ते सर्व प्रथम मुंबईमध्ये आले. नंतर मिल मध्ये काम करत रात्र शाळेत १२वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर हळुह्ळु दत्तसेवा मंडळाची स्थापना केली व प्रारंभी गावकडील मंदिराचा जिर्णोध्दार केला व समाजसेवेचा वसा हाती घेतला पुढे शासकीय सेवेमध्ये रुजु झाले. तरीही तेथे ते थांबले नाहीत. माझ्या गावामध्ये असणारा रोजगाराचा प्रश्न त्यांनी जाणला. व दत्तसेवा पतपेढेची स्थापना केली. आज या संस्थेच्या 19 शाखा कार्यरत आहेत. व एकुण 234 कर्मचारी रोजगार मिळवत आहेत. संस्था असुन देखील त्यांना शहरामध्ये शिक्षणाच्या सोई भरपुर आहेत. त्यामुळे इथला विदयार्थी प्रत्येक स्तरावर काम करताना दिसतो. प्रसंगी या सर्व सोयीची ग्रामीण भागामध्ये कमतरता दिसते.या करिता त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या जन्मभुमीमध्ये दत्तसेवा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली व सध्या १००० विदयार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. नुसतेच शिक्षण घेत नाहीत तर स्पर्धेच्या युगातील सर्व शैक्षणिक सोयी या संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांच्या कर्तॄत्वामुळे गावाचे नाव आज राज्यपातळीवर यशस्वी गाव म्हणुन ओळखले जाते. ग्रामीण भागात त्यांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वाचनालय, मोफ़त वह्या वाटप इ. कार्यक्रम यशस्वी केले आहेत. यामुळे त्यांना साथ संगत मानपत्र, राष्ट्रीय निर्माण रत्न, शिक्षण रत्न, सहकार भुषण, भास्कर २००७ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. अशा या थोर पुरुषाच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा व समाज कार्यास मानाचा मुजरा !